। नवी दिल्ली । दि.01 एप्रिल । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. NIA च्या मुंबई ब्रांचला धमकीचा मेल आला आहे. धमकी देणाऱ्यांनी दहशतवाद्यांशी आपला संबंध असल्याचा दावादेखील केला आहे. आरडीएक्स हल्ल्याचा कट असल्याची माहिती त्यात आहे.
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या मुंबई शाखेला एक ई-मेल आला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला करण्यासाठी दहशतवाद्यांचे २० गट सक्रिय झाल्याचे तसेच आरडीएक्सच्या साहाय्याने स्फोट घडवून मोदींचा घातपात करण्यात येईल, असे या मेलमध्ये म्हटले आहे. हल्ल्याची योजना तयार आहे. तसेच दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचे म्हणले आहे.
----------------
खालील बातम्या वाचा...
शेततळ्यामध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा मृत्यू
राज्यामध्ये उष्माघाताचा पहिला बळी
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरात वाढ