। अहमदनगर । दि.04 एप्रिल । लग्नाआधी विद्यार्थिनीसोबत काढलेले फोटो तिच्या नवर्याला व आईला दाखवील, अशी धमकी देवून लोणी परिसरात राहणार्या विद्यार्थिनीवर कोपरगावच्या आरोपी तरुणाने बाभळेश्वर येथील लॉजवर व निर्मळपिंपरी जवळील द्वारकाइन लॉजवर घेवून जावून बळजबरीने शारीरिक संबंध करून बलात्कार केला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
पीडित विवाहित तरुणीने लोणी पोलिसांत फिर्याद दिल्यावरून आरोपी अमित संजय पंडीत (राहणार कोपरगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पिडीत विवाहित तरुणीने फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपीने माझ्यासोबत काढलेले फोटो पतीला व आईला दाखवील, फेसबुकवर टाकील आणि तुझी बदनामी करेल,
अशी धमकी देवून बाभळेश्वरच्या लॉजवर व हॉटेलच्या लॉजवर नेवून बलात्कार करून धमकी दिली. याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलिस पुढील तपास करीत आहेत.
Tags:
Crime