। मुंबई । दि.03 एप्रिल । राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.
शिवाजी पार्क येथील गुढीपाडवा मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना, राष्ट्रवादींवर टीकास्त्र सोडले. तसेच मुख्यमंत्रिपदावरुन उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
1999 ला जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं. त्यापूर्वी जात ही अभिमान होती. मात्र राष्ट्रवादीच्या जन्मानंतर यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवलं.
आम्ही जातीतून बाहेर पडणार नाही, तर मग आम्ही हिंदू कधी होणार, असे राज ठाकरे म्हणाले. बाबासाहेब पुरंदरेंनी इतिहास लिहिला म्हणून त्यांना जातीवरून सॉफ्ट टार्गेट केलं गेलं.
ते काही म्हणाले की ते ब्राम्हण आहेत, असं म्हणत त्यांच्यावर टीका व्हायची, असेही राज ठाकरे म्हणाले.
----------------
खालील बातम्या वाचा...
💢 जुने जिल्हाधिकारी कार्यालय इमारत इतर सरकारी कार्यालयांसाठी मिळणार
💢 शनिवारी नेप्ती उपबाजार समितीमध्ये कांद्याला काय मिळला भाव
💢 विविध गुन्ह्यात जप्त केलेल्या दारूचा मुद्देमाल श्रीगोंदा पोलिसांनी केला नष्ट