। सातारा । दि.09 एप्रिल । साताराच्या मैदानावर सोलापूर विरुद्ध कोल्हापूर या मानाच्या लढतीत कोल्हापुरचा मल्ल पृथ्वीराज पाटील याने अखेरच्या मिनिटात बाजी मारून महाराष्ट्र केसरीची गदा खांद्यावर घेतली.
कुस्ती क्रीडा प्रकारातील मानाची मानली गेलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती सातारा येथे पार पडली. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील विरूद्ध मुंबई पूर्वचा मल्ल विशाल बनकर समोरासमोर भिडले.
अटीतटीच्या लढतीत पिछाडीवर असताना पृथ्वीराजनं अखेरच्या 45 सेकंदात सामन्याला कलाटणी दिली. त्याने 5-4 अशा फरकाने सामना जिंकत महाराष्ट्र केसरीचा किताब आपल्या नावे केला. पहिल्या फेरीत बनकरनं 4-0 अशी आघाडी घेतली होती.
माती व गादी गटाच्या अंतीम सामने रंगतदार झाले. त्यात गादी गटातून पृथ्वीराज पाटील तर माती गटातून विशाल बनकर महाराष्ट्र केसरीचे दावेदार ठरले. पृथ्वीराज व विशाल यांच्यात उत्कंठावर्धक सामन्यात पृथ्वीरीजने बाजी मारली.
राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ आयोजित 64 वी राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा साताऱ्यातील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडली.
--------------
खालील बातम्या देखील वाचा...
‘कबड्डीचे १०० महायोद्धे’ पुस्तकाचे प्रकाशन; कबड्डी महायोद्धा कृतज्ञता पुरस्कार प्रदान
अॅड.सदावर्तेंना दोन दिवसाची पोलिस कोठडी तर 109 कर्मचार्यांना न्यायवालयीन कोठडी
साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर लक्ष द्यावे, त्याशिवाय तरणोपाय नाही : उपमुख्यमंत्री