डिजिटल शिक्षण संकल्पनाबद्दल डॉ. अमोल बागुल यांना पुरस्कार

अहमदनगर । दि.03 एप्रिल । अ‍ॅडकॅम (नवी दिल्ली), भारत सरकारच्या अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद(एआयसीटीई) व तेलंगणा सरकार यांच्यावतीने आयोजित राष्ट्रीय शिक्षण परिषदेत अहमदनगर येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानीत शिक्षक डॉ.अमोल बागुल यांना एनसीईआरटीचे सचिव मेजर हर्ष कुमार यांच्या हस्ते डिजिटल एज्युकेशन व संशोधन क्षेत्रातील योगदानाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार गुरुग्राम(हरियाणा)येथील राष्ट्रीय सोहळ्यात प्रदान करण्यात आला. डॉ. बागुल यांच्या डिजिटल एज्युकेशनच्या नाविन्यपूर्ण संकल्पना आगामी शिक्षणासाठी महत्त्वाच्या ठरतील, असा विश्वास मेजर हर्ष कुमार यांनी यावेळी व्यक्त केला.

गौरवचिन्ह,प्रमाणपत्र व रोख रक्कम असे या राष्ट्रीय पुरस्काराचे स्वरूप असून या सोहळ्यासाठी प्रो.एम.पी.पुनिया, डॉ. विश्वजीत साहा (संचालक,शिक्षण व प्रशिक्षण,सीबीएसई बोर्ड),युवराज मलिक (संचालक,नॅशनल बुक ट्रस्ट ऑफ इंडिया), प्रो.राजीव कुमार(सदस्य सचिव) अ‍ॅडकॅमचे जे. आनंद उपस्थित होते.

कोरोनाच्या कालावधी जगभरातील शिक्षकांनी विविध संकल्पनाच्या माध्यमातून शिक्षणाची प्रक्रिया अव्याहत चालू ठेवली. कल्पक व संशोधक शिक्षकांमुळे डिजिटल एज्युकेशन व संशोधन क्षेत्रातील विविध संकल्पना जगासमोर आल्या व वापरल्या गेल्या. डॉ.बागूल यांच्यासारख्या प्रयोगशील शिक्षकांमुळे शिक्षणक्षेत्राला नवा चेहरा प्राप्त होत आहे, असे हर्ष कुमार म्हणाले. ऑनलाइन परीक्षणातून व मुलाखतीतून डॉ.बागुल यांची या राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. कार्यक्रमस्थळी डॉ.बागुल यांच्या कामाचे सादरीकरण झाले.

25 लाखावर सहभाग
25मार्च 2020 पासून कोरोना लॉकडाऊन मध्ये डॉ. बागूल यांनी सुरू केलेल्या ई-लोक शिक्षा अभियानास  25 सप्टेंबर 2022 रोजी 2 वर्षे पूर्ण झाली आहेत. यामध्ये सुमारे 94 देशातील 25 लाखांपेक्षा अधिक शिक्षक,पालक,विद्यार्थी सहभागी झाले आहेत. इंटरनेटचा वापर करून सामान्य नागरिकांना लोकांना विविध सोशल मिडियाच्या पच्या माध्यमातून शैक्षणिक,सामाजिक,सांस्कृतिक, संगणकीय स्तरावरील प्रशिक्षणे, सेमिनार,अभ्यासक्रम यांची माहिती ऑनलाइन पाठवण्याच्या उपक्रमाला डॉ. बागुल यांनी ई-लोक शिक्षा अभियान असे नाव दिले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post