भिंगार येथे मराठा वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन


। अहमदनगर । दि.06 एप्रिल । आजच्या धकाधकीच्या जीवनात सकल मराठा  समाजातील उपवर मुला मुलींच्या विवाह जुळविण्यासाठी प्राथमिक परिचयाची आणि संवादाची नितांत आवश्यकता आहे. सध्याच्या काळात व्हाट्सअप ग्रुप वर फक्त बायोडाटा टाकून तो बायोडाटा सर्व पाहतील असे नाही,

त्यासाठी भिंगार शहरात सकल मराठा समाज भिंगार व संभाजी ब्रिगेड अहमदनगर व सकल मराठा सोयरीक ग्रुप अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि.14 एप्रिल रोजी सकाळी 10 वा. भाग्य लक्ष्मी लॉन्स, पंपींगस्टेशन, भिंगार, अहमदनगर येथे सकल मराठा वधू-वर थेट-भेट परीचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती सकल मराठा सोयरीक ग्रुपचे अच्युत गाडे व विनोद वाडेकर यांनी दिली.
 
या मेळाव्यात आपल्या समाजातील सर्व विवाहयोग्य मुलं आणि मुली तसेच पालक यांनी कुठलाही संकोच मनात न ठेवता उपस्थित राहायचे आहे, जेणेकरून आपण आपल्या समाजबांधवांना सोबत आणि योग्य त्या व्यक्तीसोबत विवाह संबंधी संवाद साधू शकतो.

आपले मूळ गाव सोडून नोकरी-व्यवसायानिमित्त शहरात वास्तव्यासाठी असणार्‍या मंडळींनी सुद्धा आवर्जून उपस्थित राहायचे आहे कारण या कार्यक्रमाला शहरी आणि ग्रामीण भागातील आपले सर्व नातेवाईक आवर्जून उपस्थित राहणार आहेत विवाहयोग्य वर-वधू आणि पालक यांनी आपले माहिती पत्र बायोडाटा किमान पाच झेरॉक्स जवळ ठेवायला पाहिजे.नोंदणी ज्यांना शक्य आहे त्यांनी अगोदरच्या दिवशी नोंदणी केली तर नियोजन करायला सोयीचे होईल कार्यक्रम करणे आवश्यक आहे नंतर सुद्धा नोंदणी चालूच राहील.

मेळाव्यात सर्व पालकांनी आपल्या मुलींना आणण्यास कुठलाही संकोच बाळगू नये कारण परिचय मेळाव्यात फक्त आणि फक्त मराठा समाज सहभागी राहील इतर कुठलीही व्यक्ती कार्यक्रमाला नसेल किंवा इतर दुसरा कुठलाही कार्यक्रम नसेल फक्त राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ मॉ.साहेब यांचे पूजन वगळता कार्यक्रमाला उपस्थित सर्व आपलेच सगेसोयरे असल्यामुळे मुलांना विशेषतः मुलींना येण्यास काही हरकत नाही.

सदर मेळाव्याचे आयोजन करणे म्हणजे आपण समाजाचे काही देणे लागतो आणि या निमित्ताने समाज संघटित होण्यासाठी मदत होते या उदात्त हेतुने नाममात्र फि मध्ये अहमदनगर तालुक्यातील सर्व थोरामोठ्यांच्या सहकार्याने व मार्गदर्शनाने परिचय मेळावा आयोजित केलेला आहे कृपया सर्वांनी मिळून मिसळून कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करा ही आपल्या मराठा समाजाला वधू-वर पालक परिचय मेळावा समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.

या मेळाव्यात संबंधित संपर्क साधण्यासाठी मोबाईल नंबर 99 60 19 30 54  साधावा असे आवाहन सकल मराठा सोयरीक ग्रुपच्या संस्थापक जंयकिसण वाघ राज्यध्यक्षा सौ.रजनीताई गोंदकर, जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मडके, हरीभाऊ जगताप,अनिल गडाख,मायाताई जगताप, शितल चव्हाण, राजेश सरमाने यांच्या सह मराठा महासंघ,मराठा सेवा संघ ,संभाजी ब्रिगेड, संकल मराठा भिगांर परिसर , या पदाधिकार्‍यांनी नियोजन केले आहे.

------------------

खालील देखील बातम्या वाचा...

कामरगाव रस्ते अपघातातील जखमीचा उपचारापूर्वीच मृत्यू 

ऊर्जा विभागातील कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही : डॉ. राऊत 

जादूटोणा विरोधी कायदा प्रचार व प्रसार अंमलबजावणी समितीने सुचविलेल्या सूचनांवर कार्यवाही करा : धनंजय मुंडे 

Post a Comment

Previous Post Next Post