विवाहितेचा गळा दाबून व विष पाजून खून...पतीस अटक


। अहमदनगर । दि.05 एप्रिल । विनायकनगरच्या समता कॉलनीत घरामध्ये संशयितरित्या मृतावस्थेत आढळून आलेली विवाहिता सरोज रवी उपाध्ये (वय 30, रा. विनायकनगर, अहमदनगर) हिच्या मृत्यूचे गूढ उकलले आहे. तिचा गळा दाबून व तिला विषारी औषध पाजून तिचा खून करण्यात आला असल्याचे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या पोस्टमार्टेम अहवालातून समोर आले आहे.

याप्रकरणी तिचा पती रवी उपाध्ये याला अटक करण्यात आली आहे. आठ दिवसांपूर्वी म्हणजे मागील 28 मार्च 2022 रोजी सरोज मृतावस्थेत आढळून आली होती. यानंतर तिच्या मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. सुरुवातीला सरोजच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा पती, सासू-सासरे व नणंद यांच्याविरोधात आत्महत्येसप्रवृत्त करणे व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र, आता वैद्यकीय अहवालात तिचा खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्याने या दाखल गुन्ह्यात खुनाचे वाढीव 302 कलम लावण्यात आले आहे. याप्रकरणी अशोककुमार नंदकिशोर तिवारी (वय 37 रा. दिल्ली, मुळ रा. राजस्थान) यांनी दिलेल्या फिर्यादीत सरोजचा पती रवी मुरलीधर उपाध्ये, सासरे मुरलीधर हुकुमचंद उपाध्ये, सासू परमा मुरलीधर उपाध्ये व नणंद पूजा सुनील जोशी (सर्व रा. विनायकनगर) यांचा समावेश आहे. पती रवी उपाध्ये याला अटक करण्यात आली आहे.

सरोजचा गळा दाबून व विषारी औषध पाजून जीव घेतल्याचे समोर आल्यानंतर खुनाच्या गुन्ह्याचे वाढीव कलम लावण्यात आल्यानंतर या गुन्ह्याचा तपास कोतवालीचे पोलिस निरीक्षक संपत शिंदे स्वतः करीत आहेत. सरोजचा विवाह सन 2012 मध्ये रवी उपाध्ये याच्यासोबत झाला होता. वर्षभर सासरच्या लोकांनी सरोजला चांगले नांदविले. यानंतर तिला वेळोवेळी शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करण्यात आली होती.

माहेरून गाडी घेण्यासाठी पैसे आणावे म्हणून शिवीगाळ, मारहाण करायचे. राजस्थानचे माहेर असलेल्या सरोजचा विवाह समता कॉलनीत राहणार्‍या रवी उपाध्याय याच्यासोबत झाला होता. त्यांना दोन मुले आहेत.

---------------- 

खालील बातम्या देखील वाचा...

पानिपत येथील मराठा युद्ध स्मारकाच्या विकासासाठी सहकार्य करणार 

नाराज पत्नीची समजून काढायला गेलेल्या पतीला सासूरवाडीत मारहाण...  

साईबाबांच्या चरणी सोन्याचा मुकुट अर्पण… 

 

Post a Comment

Previous Post Next Post