। अहमदनगर । दि.08 एप्रिल । अहमदनगर शहरातील सट्टेबाजी आता समोर येत असून कोतवाली पोलिसांनी दोन सट्टेबाजी करणार्या बुकींवर कारवाई केली आहे विशाल आनंद आणि दीपक शर्मा या दोघांवर कोतवाली पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी जेव्हा पटवर्धन चौकात छापा टाकला, तेव्हा शर्मा आणि आनंद हे मोबाईलवरुन लोकांना बिंगो या जुगाराचे आयडी व पासवर्ड देऊन त्याद्वारे लोकांकडून पैसे स्वीकारुन खेळताना व खेळविताना तसेच आयपीएल क्रिक्रेट मॅचवर सट्टा लावून हार-जीतीचा जुगार खेळताना व खेळविताना मिळून आले होते.
पोलिसांनी या दोघांच्या ताब्यातून मोबाईल जप्त केले असून त्यांचे साथीदार अक्षय घोसके (पूर्ण नाव-गाव माहिती नाही) व मोहन जोशी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाच्या कर्मचार्यांनी ही कामगिरी केली आहे.