महिलांचे दागिने ओरबाडून नेणार्‍या इराणी टोळीतील दोघांना पकडले


। अहमदनगर । दि.06 एप्रिल । नगर शहर परिसरातून रस्त्याने पायी चाललेल्या महिलांच्या गळ्यातील दागीने, मोटारसायकलवर भरधाव वेगात येवून ओरबाडून नेणार्या श्रीरामपूर येथील इराणी टोळीतील दोघा आरोपींना तोफखाना पोलिसांनी पकडले आहे. तर त्यांचा एक साथीदार अद्याप फरार आहे.

तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाईपलाईन रोडवरील हॉटेल पंचवटी समोर दि.11 मार्च रोजी पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनीगंठण पाठीमागून मोटारसायकलवर भरधाव वेगात आलेल्या दोघांनी ओरबाडून पळवून नेले होते. याबाबत सुनीता हरीदास बांगर यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

या गुन्ह्याचा तपास पो.नि. ज्योती गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करत असताना त्यांना सदरचा गुन्हा श्रीरामपूर येथील इराणी टोळीतील सादक शामल खान (वय 30), रियाज फैय्याज इराणी (वय 42), शाहरुख युनूस शेख या तिघांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.

त्यानंतर उपनिरीक्षक सोळंके, पो.हे.कॉ. दत्तात्रय जपे, प्रदीप बडे, दीपक जाधव, शैलेश गोमसाळे, सतीश त्रिभूवन यांच्या पथकाने सादक खान व रियाज इराणी या दोघांना अटक केली. त्यांचा तिसरा साथीदार फारुख शेख हा फरार झाला. पकडलेल्या दोघांकडून 26 हजार रुपये किंमतीचा सोन्याच्या गंठणचा तोडून नेलेला तुकडा हस्तगत करण्यात आला आहे.

-------------- 

खालील बातम्या वाचा...

पोलीसांच्या सोयी-सुविधा व घरांसाठी अधिकचा निधी उपलब्ध करून देणार : उपमुख्यमंत्री अजित पवार 

भाजपाने प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे : प्रा.राम शिंदे 

 

 

Post a Comment

Previous Post Next Post