। मुंबई । दि.08 एप्रिल । गेल्या अनेक महिन्यापासून राज्यात एसटी कर्मचार्यांचं आंदोलन सुरू आहे. गुरुवारी कोर्टाने दिलेल्या निर्णयानंतर हे आंदोलन स्थगित होईल आणि कर्मचारी कामावर हजर होतील अशी अपेक्षा असताना आज मात्र, एसटी कर्मचार्यांनी थेट शरद पवार यांच्या घराबाहेर जोरदार आंदोलन केल्याने हे एसटी कर्मचार्यांचे आंदोलन पुन्हा चिघळणार असल्याची चिन्हे आहेत.
एसटी महामंडळाचे विलीनीकरण पूर्णपणे करावं या मागणीसाठी एसटी कर्मचार्यांचा एक गट आक्रमक झालेला पाहायला मिळाला. या आंदोलकांना आक्रमक पवित्रा घेत थेट शरद पवार यांचं मुंबईतील सिल्वर ओक हे निवासस्थान गाठलं. या निवासस्थानाच्या आवारात घुसून आंदोलक कर्मचार्यांनी चप्पल फेक केली असल्याची माहिती मिळाली आहे
यावेळी ’शरद पवार मुर्दाबाद अजित पवार मुर्दाबाद’ अशा घोषणा देत या आंदोलकांनी आपला राग व्यक्त केला आहे. शरद पवार आमच्या विलीनीकरणाच्या आड आले. अशा प्रतिक्रिया एसटी कर्मचारी देताना वृत्तवाहिनवर दिसत होते.
--------------
खालील बातम्या देखील वाचा...
आयपीएल सट्टा व बिंगो जुगार, दोन सट्टेबाज बुकींवर कारवाई
१०२ कोटींच्या बनावट खरेदी बिलांचा वापर करुन इनपूट टॅक्स क्रेडिट (ITC) घेण्याऱ्या व्यापाऱ्यास अटक
नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनपात पाण्यासाठी मटका फोड आंदोलन
Tags:
Breaking