जिल्हा बँकेकडून तीस हजार रुपये एकरी कर्ज
पीककर्जाचे प्रमाण वाढविणार : अॅड. उदय शेळके
। अहमदनगर । दि.01 एप्रिल । दि.31- शेतकर्यांची कामधेनू असणार्या जिल्हा बँकेने शेतकर्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून पीककर्जाचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
कर्जमर्यादा एकरी वीस हजारांवरून तीस हजार करण्याबाबत सर्व संचालकांनी सूचना केल्या आणि त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण जिल्हा बँकेचे अध्यक्ष अॅड. उदय शेळके यांनी केले.
जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत शेतकर्यांना मदत करण्याच्या अनुषंगाने एकरी कर्ज मर्यादेत वाढ करण्याचा विषय संचालकांनी मांडला. पीककर्जाच्या जोडीने पशुधनासाठीच्या कर्जाचा विषयही मांडला गेला.
शेतकरीहिताचे निर्णय जिल्हा बँकेने सातत्याने घेतले असून, यापुढच्या काळातही बँकेची तीच भूमिका राहणार असल्याचे अध्यक्ष अॅड. शेळके आणि उपाध्यक्ष अॅड. माधवराव कानवडे यांनी सांगितले.
दरम्यान, काही तालुक्यांमध्ये गरज नसताना पशुपालनासाठी कर्ज वाटले गेले असून, त्यांची थकबाकी वाढत चालली आहे. पशुपालन कर्जवाटप झालेले काही तालुके पुढील दोन-तीन वर्षे शेती कर्जाला मुकण्याची भीतीही त्यांनी या वेळी व्यक्त केली.
---------------
खालील बातम्या वाचा....
उड्डाणपुलाचे काम करताना महावितरणच्या केबल तोडल्या : गुन्हा दाखल
मंत्रिमंडळ निर्णय : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्याच्या दरात वाढ
Tags:
Ahmednagar