प्रेम प्रकरणातून इंजिनियर तरुणाची आत्महत्या?


।  औरंगाबाद । दि.05 एप्रिल । पैठण तालुक्यातील पिंपळवाडी परिसरातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इंजिनियरिंगचे शिक्षण घेतलेल्या एका २५ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. 

निखिल दत्तात्रय चौडांळे (रा. आदर्शनगर, पिंपळवाडी, ता. पैठण) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. निखलने उचलेल्या टोकाच्या पाऊलामुळे त्यांच्या घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. तर, प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

निखिलने आत्महत्या केलेल्या खोलीत पोलिसांना काही प्रेमपत्र आढळून आली आहेत. एका प्रेमपत्रात ”तेरे बिन नही जीना मर जाना ढोलना” अशी हिंदी चित्रपटातील गाण्याची ओळ लिहिण्यात आली आहे. पोलिसांनी सर्व पत्रे ताब्यात घेतली आहेत. तसेच, युवकाने आत्महत्या का केली? त्याचे प्रेमसंबंध होते का? या बाबत पोलीस माहिती घेत आहेत. 

-----------------

खालील बातम्या देखील वाचा...

विवाहितेचा गळा दाबून व विष पाजून खून...पतीस अटक 

माजी मंत्री बसवराज पाटील यांना काशी पिठाकडून समाज भूषण पुरस्कार प्रदान

नाराज पत्नीची समजून काढायला गेलेल्या पतीला सासूरवाडीत मारहाण...  

Post a Comment

Previous Post Next Post