26 गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

26 गुन्ह्यात फरार असलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई 


। अहमदनगर । दि.05 एप्रिल । अहमदनगर जिल्ह्यासह राज्यातील विविध शहारत 45 गंभीर गुन्हे दाखल असलेला व तिन मोक्क्याच्या गुन्ह्यासह एकुण 26 गंभीर गून्ह्यात फरार असलेल्या सराईत आरोपी संदीप ईश्वर भोसले याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे.

महाराष्ट्रातील गुन्हेगारी विश्वातील कुविख्यात अशी संदीप ईश्वर्‍या भोसलेची ओळख असून त्याला रत्नागिरी येथे अटक करण्यात आली पोलिसांनी संदीप ईश्वर्‍या भोसले याला पकडण्यासाठी तीन दिवस सापळा लावला होता. शेतमजूर कमवाले असा वेष परिधान करून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी संदीप ईश्वर्‍या भोसलेच्या मागावर होते.

जेव्हा संदीप ईश्वर्‍या भोसले पोलिसांच्या नजरेच्या टप्प्यात आला तेव्हा पोलीस आपल्या मागावर असल्याचे समजताच संदिप ईश्वर्‍या भोसले याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता तीन किलोमीटर पाठलाग करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अखेर त्याला जेरबंद केले. अनेक वर्षांपासून तो फरार होता काही दिवसांपूर्वी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तो पळून जाण्याचा यशस्वी झाला होता.

सदरची कामगिरी जिल्हापोलिस अधीक्षक मनोज पाटील अपर पोलीस अधीक्षक सौरवकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शकाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके सपोनि सोमनाथ दिवटे, पोहेकॉ सुनिल चव्हाण, दत्ता हिंगडे, संदीवार, पोकॉ सागर ससाणे व रणजीत जाधव यांनी केली आहे.

सदर गुन्हाचा स्थानिक गुन्हे शोखतील अधिकारी व अंमलदार हे समांतर तपास करीत असतांना गुन्हयातील आरोपी नामे मिलन उर्फ मिलींद ईश्वर भोसले (वय 23, रा.बेलवंडी,ता.कर्जत हल्ली राहणार वनकूटे शिवार, ता.पारनेर) यास ताब्यात घेवुन तपासा दरम्यान याने 1,01,850/- रुपये किंमतीचा मुद्देमाल काढुन दिला. तसेच सदरचा गुन्हा त्याचे साथीदार संदीप ईश्वर भोसले, मटक ईश्वर भोसले, पल्या ईश्वर भोसले, अटल्या उर्फ अतूल ईश्वर भोसले अशांनी मिळून केल्याची कबुली दिली आहे.
-------------------

खालील बातम्या वाचा...

प्रेम प्रकरणातून इंजिनियर तरुणाची आत्महत्या? 

विवाहितेचा गळा दाबून व विष पाजून खून...पतीस अटक 

नाराज पत्नीची समजून काढायला गेलेल्या पतीला सासूरवाडीत मारहाण...  


Post a Comment

Previous Post Next Post