। औरंगाबाद । दि.09 एप्रिल । येथील विवाहितेने पोटच्या मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
महिलेने रेल्वेतून उडी मारुन मुलीसह आपल्या आयुष्याची अखेर केली. औरंगाबाद जिल्ह्यात हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
24 वर्षीय महिलेने टोकाचं पाऊल उचललं. औऱंगाबादमधील पोटूळ रेल्वे स्टेशनच्या जवळ ही घटना घडली आहे.
महिलेने स्वतःसोबत 3 वर्षांच्या मुलीचीही जीवनयात्रा संपवली. मायलेकीने रेल्वेतून उडी मारुन आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे.
संबंधित महिला आणि तिची मुलगी या औरंगाबाद शहरातील बालाजी नगर भागातील रहिवासी होत्या.
महिलेने कुठल्या कारणास्तव हे टोकाचं पाऊल उचललं, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. गोंडस मुलीसह महिलेने आत्महत्या केल्याच्या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
---------------
खालील बातम्या देखील वाचा...
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील हल्ला अतिशय निंदनीय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर लक्ष द्यावे, त्याशिवाय तरणोपाय नाही : उपमुख्यमंत्री
सूपर मार्केटमध्ये वाईन विक्रीबाबतच्या निर्णयावर २९ जूनपर्यंत सूचना व हरकती पाठविण्याचे आवाहन
Tags:
Maharashtra