आज 11 रूग्णांना डिस्चार्ज तर
नव्या 06 बाधितांची रुग्णसंख्येत भर
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.15 टक्के
। अहमदनगर । दि.07 एप्रिल । जिल्ह्यात आज 11 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 3 लाख 87 हजार 456 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 98.15 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 06 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 81 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज 03 रुग्ण, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 03 आणि अँटीजेन चाचणीत 00 रुग्ण बाधीत आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आढळून आलेल्या रुग्णांमध्ये पाथर्डी 02 आणि श्रीरामपूर 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 02 आणि नेवासा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 00 जण बाधित आढळुन आले. यात 00 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 03, नगर ग्रा 02, पारनेर 01, पाथर्डी 02, शेवगाव 01 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
*बरे झालेली रुग्ण संख्या:3,87,456
*उपचार सुरू असलेले रूग्ण:81
*पोर्टलवरील मृत्यू नोंद:7225
*एकूण रूग्ण संख्या:3,94,762
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)
दिनांक 07 एप्रिल , 2022
घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा
प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा
स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या
Tags:
Ahmednagar