। मुंंबई । दि.09 एप्रिल । शुक्रवारी शरद पवार यांच्या घरावर झालेल्या आंदोलना प्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांना 11 एप्रिल म्हणजेच दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
तसेच शुक्रवारच्या आंदोलनातील इतर 109 एसटी कर्मचार्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टात याबाबत आज (शनिवारी) सुनावली झाली.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिलव्हर ओक घरावर 8 एप्रिलला एसटी कर्मचार्यांनी आंदोलन करत हल्ला केला होता. याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह 110 आरोपीना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होता.
न्यायमूर्ती सावंत यांच्या कोर्टात ही सुनावणी झाली. यानंतर सदावर्ते यांच्यासह सर्व आरोपींची चौकशी कारण्याची गरज असल्याने त्यांना 14 दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती.
गुणरत्न सदावर्ते यांच्या बाजूने त्यांच्या पत्नी जयश्री पाटील व महेश वासवानी यांनी बाजू मांडली. तर सरकारच्यावतीने प्रदीप घरत यांनी बाजू मांडली.
Tags:
Maharashtra