। अहमदनगर । दि.28 मार्च । नगर मनमाड रोडने मनमाडहुन नगर कडे येणार्या टाटा कंपनीच्या लेलँड मालट्रकने ( क्रमांक एम एच 16 सीसी 5759 ) दुचाकीस ( क्रमांक एम एच 16 बी ई 4955 ) ला समोरून जोरात धडक दिली.
या धडकेत दुचाकीवरील पाथर्डी तालुक्यातील दोघे खाली पडून गंभीर मार लागल्याने मयत झाले. ही घटना नगर मनमाड रोड वरील पत्रकार चौकात घडली आहे.
भरधाव वेगातील मालट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार खाली पडल्याने घटना स्थळा वरील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. दुचाकीस्वारांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
परंतु उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले जे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. दोन्ही मृत तरुण पाथर्डी तालुक्यातील कोलार येथे असल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात दुपारी उशिरापर्यंत अपघाताच्या गुन्ह्याची नोंद घेण्याचे काम सुरू होते.
-----------
खालील बातम्या वाचा...
आज 09 रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या 05 बाधितांची रुग्णसंख्येत भर
धक्कादायक : उमरग्यामध्ये 40 विद्यार्थ्यांना विषबाधा
स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
Tags:
Breaking