वर्‍हाडाची बस भाकरपेटा घाटात कोसळून भिषण अपघात


। आंध्र प्रदेश । दि.27 मार्च । आंध्र प्रदेशामधील चित्तूर जिल्ह्यातील भाकरपेटा कनुमा येथे मदनपलले - तिरुपती महामार्गावर एका खासगी बस दरीत कोसळून झालेल्या अपघाता आठ जण ठार झाले तर 45 जण जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.

या भिषण अपघातामध्ये एक बालक आणि एका महिलेसह आठ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहितीमधून पुढे येत आहे. बचाव पथकाने मृतांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु केले आहे.

या बसमध्ये सुमारे 63 प्रवासी असावेत असा अंदाज आहे. असच्या ओव्हरस्पीडमुळे दरीत कोसळली असावी. जखमींपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

अनंतपूर जिल्ह्यातील धर्मावरम येथील राजेंद्र नगर येथील वेणूचे, चित्तूर जिल्ह्यातील नारायणवनम भागातील एका मुलीशी लग्न होत होते. रविवारी सकाळी थिरुचनूरमध्ये लग्णसोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

वेणू (वधू) चे कुटुंबीय इतर 63 जणांसह एका खाजगी बसमधून दुपारी 3.30 वाजता धर्मावरमहून निघाले. चित्तूर जिल्ह्यातील पीलेरू येथे रात्री ढाब्यावर सर्वांनी जेवण केले.

यानंतर पुन्हा पुढचा प्रवास सुरू केला आणि भाकरपेटा घाट गाठला. वळण घेताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ते दरीत कोसळले. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जखमींना तिरुपतीच्या रुग्णालयांत हलवण्यात आले आहे.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------

पहिल्याच बैठकिमध्ये योगींचा मोठा निर्णय... 

पेट्रोल, डिझेलचे दर चौथ्यांदा वाढले

बेलवंडी येथील प्राथमिक शिक्षकाची मुलगी झाली पीएसआय 

Post a Comment

Previous Post Next Post