। अहमदनगर । दि.27 मार्च । पुणे, औरंगाबाद, नाशिक, अहमदनगर येथून मोटारसायकल चोरी करणार्या अट्टल गुन्हेगारांना श्रीरामपूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. साडेतीन लाखाच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
शहर पोलीस पथकाने सापळा रचून ज्ञानेश्वर महादेव देवकर रा. नेवासा, नल्ल्या उर्फ आकाश अनिल गायकवाड रा. नेवासा यांना अटक करुन त्यांचेकडून तपास करत होन्डा शाईन कंपनीचे 3 मोटारसायकल, एक हिरो एच.एफ. डिलक्स, एक होन्डा अॅक्टीवा असे एकूण 5 मोटारसायकल (एकूण किम्मत 3,50,000रुपये). मुद्देमाल जप्त केला आहे.
सदर मोटार सायकल पुणे, नाशिक अहमदनगर औरंगाबाद येथून चोरी केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. आरोपी ज्ञानेश्वर महादेव देवकर यांचेवर वैजापूर, सांगवी, पुणे ग्रामिण, सोनईे, नेवासो, हडपसर, बदलापूर आदी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, पोलीस उपअधिक्षक, संदिप मिटके, यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली श्रीरामपुर शहर पोस्टेचे पोलीस निरीक्षक संजय सानप यांचेसह
पोलीस निरीक्षक जिवन बोरसे व पोलीस नाईक पंकज गोसावी, पोलीस नाईक रघुवीर कारखेले, पोलीस नाईक एम. के. शेलार, पोलीस कॉन्स्टेबल राहुल नरवडे, पोलीस कॉन्स्टेबल गौतम लगड, पोलीस कॉन्स्टेबल रमिज आत्तार यांचे पथकाने केली आहे.
Tags:
Ahmednagar.L
Crime