दरोड्याच्या गुन्ह्यातील मोक्का लावलेल्या दरोडेखोरांना पकडले


। अहमदनगर । दि.27 मार्च । दरोड्याच्या गुन्ह्यात ’मोक्का’ कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेल्या चार आरोपींना पोलिसांनी अटक केली. कृष्णा विलास भोसले (वय 22), रावसाहेब विलास भोसले (वय 40), आजिनाथ विलास भोसले (वय 25) व भरत विलास भोसले (सर्व रा. हातवळण दाखले ता. आष्टी जि. बीड) अशी या आरोपींची नावे आहेत.

नगर तालुक्यातील साकत शिवारातील नगर-सोलापूर महामार्गावरील पेट्रोलपंपावर दरोडा टाकून लूटमार केल्याची घटना दि. 1 ऑगस्ट 2021 रोजी पहाटे घडली होती. याप्रकरणी नगर तालुका ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस तपासादरम्यान हा गुन्हा भोसले टोळीने केल्याचे सिध्द झाले होते. भोसले टोळीविरुध्द 30 डिसेंबर 2021 रोजी मोक्का नुसार कारवाई करण्यात आली आहे. 

कुख्यात गुन्हेगार आजिनाथ भोसलेसह सहा आरोपींचा यात समावेश आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पसार झाले होते. त्यातील चार जणांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यातील सुरेश काळे (रा. सोनविहीर, ता. शेवगाव) व पवन काळे (रा. गुनवडी ता. नगर) हे पसार आहेत. या गुन्ह्याचा तपास नगर ग्रामीणचे पोलिस उपअधीक्षक अजित पाटील करीत आहेत.

---------- 

💥 उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते समता सहकारी पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे उद्घाटन

💥 हवाई क्षेत्रातील करिअरमध्ये उंच झेप घ्या : मंत्री सुनील केदार

💥 मोटारसायकली चोरणारे अट्टल गुन्हेगार जेरबंद 

Post a Comment

Previous Post Next Post