। अहमदनगर । दि.29 मार्च । अहमदनगर जिल्हा सहजयोग समितीच्या वतीने नगर -कल्याण रोड वरील पूनम मंगल कार्यालयात प. पु. माताजी श्री निर्मला देवी प्रणित सहजयोग प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते याचे उदघाटन महापौर रोहिणीताई शेंडगे यांचे हस्ते झालें या वेळी मनपा चे स्थायी समिती चे सदस्य, नगरसेवक सचिन शिंदे, नगरसेवक श्याम नळकांडे उपस्थित होते.
सदर सहजयोग प्रदर्शन उदघाटन प्रसंगी बोलतांना महापौर रोहिणीताई शेंडगे म्हणालेत सहजयोगा मुळे मानवाला संतुलन प्राप्त होते. सध्याच्या परिस्थिती मध्ये ध्यान धारणा करणे गरजेचे आहे. सहजयोग हा सामाजिक ऐकतेचा संदेश देत असल्यामुळे सहजयोग आत्मसात करणे काळाची गरज आहे.
या वेळी नगरसेवक सचिन शिंदे म्हणाले सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही सहजयोग कार्यास नित्य नियमाने सहकार्य करू. सहजयोग ध्यान केल्यामुळे माणूस निरोगी व निर्भय होतो ही बाब महत्वाची आहे.
या वेळी अहमदनगर जिल्हा सहजयोग समन्वयक श्रीनिवास बोज्जा यांनी उपस्थिताचे स्वागत केले. या वेळी नगर कल्याण रोड वरील अनेक साधकांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. सदर प्रदर्शन सकाळी 10 ते सायंकाळी 7.30 पर्यंत ठेवण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लक्ष्मण अंदे यांनी केले तर आभार गणेश कोडम यांनी मानले.
सदर कर्यक्रम यशस्वीते साठी गणेश भुजबळ, सुधीर सरोदे, राजू द्यावनपेल्ली,लक्ष्मीकांत वाळेकर, जनार्धन मडुर, डॉ.आगरकर काका, रवि आगरकर, बालाजी मेरगू, संदीप ओहोळ, सोमेश थोरात, मयूर वैद्य, गणेश कोडम, दांगडे मेजर, विनायक जोग, अविनाश आडेप, सविता कोडंम, रेणुका मोहन रच्चा, गवळी, सुनंदा तोगे, उषा दांगडे, श्रीमती सामलेटी, अनिता अंदे,प्रिया मेरगू, अश्विनी वाळेकर,पूजा आगरकर,सारिका जंगम,आसाल, कु. वैष्णवी कोडम, कु. प्रिया कोडम, कु. भक्ती जंगम यांनी परिश्रम घेतले.
Tags:
Ahmednagar