। सिल्लोड । दि.30 मार्च । अजिंठा येथील बसस्थानकाच्या पाठीमागे असलेल्या अनाड रस्त्याजवळ एका शेततळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या दहावीच्या वर्गातील तीन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे.
तर इतर दोघे यात बचावले आहेत. ही घटना बुधवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विजय मराठे, सहायक पोलीस निरीक्षक अजित विसपुते, अक्रम पठाण, शेळके यांनी घटनास्थळी भेट दिली.
सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गाव परिसरातील अनाड रस्त्यावर एका शेततळ्यात बुधवारी दुपारी 3 मुलांचा बुडून मृत्यू झाला आहे. यावेळी परिसरातील नागरिकांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले, मात्र त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता.
उमेरखान नासिरखांन पठान (वय 16 वर्ष रा.उर्दूशाळेजवळ अजिंठा), शेख मोहमद अनस हब्दुल हाफिज (वय 16 वर्ष रा.उर्दूशाळेजवळ अजिंठा), अक्रमखान आयुबखान पठान (वय 16 वर्ष रा.बगीचा मज्जीत समोर अजिंठा) असे मृत झालेल्या मुलांची नावे आहेत.
Tags:
Maharashtra