। मुंबई । दि.02 मार्च । दिशा सलियन यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने मालवणी पोलीस ठाण्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना 4 मार्च रोजी सकाळी 11 वाजता, तर भाजपा आमदार नितेश राणे यांना 3 मार्च रोजी सकाळी 11 वाजता हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे.
दिशा सालियानवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा दावा नारायण राणे यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत केल्यानंतर त्यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. यासंदर्भात दिशा सालियानच्या आई-वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर नारायण राणे आणि नितेश राणे यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याच प्रकरणाच्या तपासासंदर्भात आता मालवणी पोलिसांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांना नोटीस बजावली आहे. नितेश राणेंना 3 मार्च रोजी, तर नारायण राणेंना 4 मार्चला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश या नोटिशीद्वारे देण्यात आलेत. दिशा सालियन प्रकरणात आता राणे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Tags:
Politics