महाविकास आघाडीत राष्ट्रवादी नवरा असून शिवसेना मुकी बायको अन् कॉग्रेस वऱ्हाडी आहे...

। अहमदनगर । दि.27 मार्च ।  राज्यातील महाविकास आघाडीचा  संसार म्हणजे राष्ट्रवादी व शिवसेनेचे  लग्न झाले आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस  नवरा, तर शिवसेना मुकी बायको आहे. दुसरीकडे लग्नाचे निमंत्रण नसतानाही तिरस्कार सुरू असतानाही वर्‍हाडी म्हणून काँग्रेस सोबत गेली आहे. 

काँग्रेसच्या मंडळींना हाणाले तरी खाली बसून जेवणाचे ताट सोडायला तयार नाहीत, अशी टीका  खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर केली.

विळद घाटात येथे ते पत्रकारांशी बोलत होते. महाविकास आघाडीच्या कारभारावर त्यांनी टीका केली. खासदार  विखे पाटील म्हणाले, पूर्वी तत्त्वावर सरकारची स्थापना व्हायची. आता मात्र स्वार्थावर सरकार स्थापन होत आहे.

जनतेचा कौल नसतानाही सत्तेत बसणण्याची काहींना हौस आहे. विशेष करून राष्ट्रवादीची सत्ता आली नसती तर त्यांचे सर्व लोक सेना-भाजपात दिसले असते.

ही भीती राष्ट्रवादीच्या नेत्यांना होती. यामुळे आपण व आपली मालमत्ता संपू नयेत, यादृष्टीने राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आलेली आहे.

महाविकास आघाडीचा संसार म्हणजे राष्ट्रवादी नवरा त्याने काहीही मनमानी केली चालते. तर शिवसेना मुकी बायकोच्या भूमिकेत असून नवरा सवत आणेल या भीतीने शिवसेना सर्व काही सहन करत आहे.

तर काँग्रेसला लग्नला बोलवले नसताना ते वर्‍हाडी म्हणून सोबत आहेत. त्यांचा तिरस्कार सुरू असताना ते काही लग्नातील फुकटचे जेवन सोडायला तयार नाहीत, असे ते म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारकडे निर्णय घेण्याची क्षमता नाही. त्यांचे प्रत्येक निर्णय वादग्रस्त ठरत आहेत. त्यांना गरीबांचं हित कशात आहे, हे कळत नाही. त्याचे देणेघेणेही नाही. ग्रामीण भागातील आमदारांना मुंबईत घरे देण्याचा निर्णयही असाच आहे. या निर्णयावर काय बोलावे, हेच कळत नाही.

Post a Comment

Previous Post Next Post