राज्यामध्ये उष्माघाताचा पहिला बळी


। जळगाव । दि.31 मार्च । 33 वर्षाचे मृत शेतकरी जितेंद्र संजय महाजन हे जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मांडळ गावातील  रहिवासी होते. त्यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार होता.

मुलींची हालाखीची परिस्थितीतर दुसरीकडे दुष्काळ यावर मात करीत ते प्रपंच चालवित होते. जळगाव - सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे प्रशासनाने नागरिकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.

असे असतानाच जळगावात तापमानामुळे शेतकर्‍यांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. राज्यातील उष्माघाताने पहिला बळी गेला आहे. जितेंद्र संजय महाजन असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे.

शासनाच्या मदतीची अपेक्षा..
जितेंद्र महाजन यांच्या परिवारात पत्नी शितल,आई उषा,मुलगी दिव्या, मुलगा ओम असा परिवार आहे. मात्र, आता हा मोठा परिवार आम्ही कसा चालवावा? आम्हाला शासनाने आता मदत करावी अशी अपेक्षा जितेंद्र यांच्या पत्नी व्यक्त केली.

Post a Comment

Previous Post Next Post