। नवीदिल्ली । दि.30 मार्च । पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये बुधवारी पुन्हा एकदा वाढ झाली आहे. गेल्या नऊ दिवसांतील एकूण दरांमध्ये वाढ होऊन ते 5.60 रुपये प्रति लिटर झाली आहे.
आज 80 पैशाने वाढ झाल्याने नागरीकांमध्ये मोठा संताप निर्माण झाला आहे. आता नागरीक उघड उघड प्रतिक्रीया देताना दिसत आहेत की, वारंवार कोणती ना कोणती निवडणुक देशात व्हायलाच पाहिजे, अन्यथा पेट्रोल आणि डिझेलचे भाव भारतात सर्वांत जास्त असतील.
मुंबईतील एकून दरात 9 दिवसात 76 पैशाची वाढ झाली आहे. किरकोळ विक्रेत्यांच्या किंमतीच्या अधिसूचनेनुसार दिल्लीत पेट्रोलची किंमत आता प्रति लिटर 101.1 रुपये असेल तर डिझेलचे दर 91.47 रुपये प्रति लिटरवरून 92.27 रुपये झाले आहेत.
तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर 115.88 रुपये आणि 100.10 रुपयांवर पोहचले आहेत. डिझेलच्या दरांनी प्रथमच शंभरी पार केली आहे.
पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांपूर्वी 4 नोव्हेंबरपासून किमती स्थिर ठेवण्यात आल्या होत्या. मधल्या काळात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यानंतरही भाव स्थिर ठेवण्यात आले होते त्यावेळी झालेला तोटा भरुन काढण्यासाठी सध्या पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्याने वाढ केली जात आहे.
---------------
खालील बातम्या देखील वाचा...
👉गावातील शाळा सक्षमीकरणासाठी प्रयत्न करावे : मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे
👉महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारास चपलांचा हार...
👉सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करुन तरुणाची आत्महत्या