केंद्राच्या कामगारविरोधी, खासगीकरण धोरणाविरोधात निदर्शन


। अहमदनगर । दि.28 मार्च । केंद्र सरकारने कामगारांचे कायदे मोडीत काढून नव्याने रूपांतरित केलेल्या 4 कोड बिल रद्द करावे, कामगार विरोधी कायदे रद्द करावे व खासगीकरणाच्या विरोधात आज जिल्ह्यातील बँक कर्मचारी, टपाल कर्मचारी, लाल बावटा कामगार युनियन व संयुक्त कृती समितीच्या वतीने निदर्शने करून धरणे आंदोलन करण्यात आले.

केंद्र सरकारने कामगार विरोधी कायदे रद्द करावे यासह विविध मागण्यांसाठी देशव्यापी संपात नगरमधील बँक कर्मचार्यांनी बंदमध्ये सहभागी होत चितळे रोड येथील युको बँकेसमोर निदर्शने केली.

याप्रसंगी संघटनेचे सरचिटणीस कॉ.कांतीलाल वर्मा, कॉ.सायली शिंदे, उल्हास देसाई, माणिक आडाणे, उमाकांत कुलकर्णी, कॉ. खामकर, मोईन शेख, प्रविण मेहेत्रे, अमोल बर्वे, प्रकाश कोटा, विजेंद्र सिंग, अजित बर्डे, गोरख चौधरी, सचिन बोठे, किर्ती जोशी, संदिप शिरोदे आदिंसह कर्मचारी उपस्थित होते.

केंद्र सरकारने कामगारांचे 44 कायदे मोडित काढून, नव्याने रुपांतर केलेल्या 4 कोड बील रद्द करावे व खासगीकरण थांबविण्याच्या प्रमुख मागणीसाठी देशातील प्रमुख व विविध क्षेत्रातील कामगार संघटनांनी दोन दिवसीय संप पुकारला असून, या संपाच्या पार्श्वभूमीवर आज 

अहमदनगर जिल्हा आयटक व लालबावटा विडी कामगार युनियन संयुक्त कृती समितीच्या वतीने शहरातील पत्रकार चौक येथील शहीद भगतसिंह यांच्या पुतळ्या समोर निदर्शने करुन धरणे आंदोलन करण्यात आले.विविध मागण्यांसाठी कामगारांनी यावेळी केलेल्या जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणला होता.



नवीन पेन्शन योजना रद्द करून पूर्ववत जुनी पेन्शन योजना सर्वाकरिता लागू करा, डाक विभागाच्या खाजगीकरणांच्या हालचाली थांबवा,यासह सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात टपाल विभागातील दोन्हीही मान्यताप्राप्त संघटना सहभागी झाल्यामुळे अहमदनगर विभागातील टपाल सेवा ठप्प झाल्याचा दावा संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संतोष यादव यांनी केला आहे.

टपाल विभागातील दोन्हीही मान्यताप्राप्त संघटना आपल्या केंद्रीय संघटनेच्या आवाहनानुसार संघटनेचे सभासद या दोन दिवसीय संपात सहभागी झालेले आहेत.आज संपाच्या पहिल्यादिवशी अहमदनगर प्रधान डाकघराच्या समोर द्वारसभेचे आयोजन केले होते. 

---------

खालील बातम्या देखील वाचा...

सायबर प्रलोभनाला बळी न पडता नेटवर्किंग साईटचा विचारपूर्वक वापर करावा : अपर पांडे

अण्णांचा सहवास कमी लाभला तरी त्यांनी केलेले कार्य जास्त स्मरणात राहील: साई पाउलबुधे 

व्यावसायिकास बॅट व स्टम्पने बेदम मारहाण 

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी नवरा असून शिवसेना मुकी बायको अन् कॉग्रेस वऱ्हाडी आहे... 


Post a Comment

Previous Post Next Post