स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबडून पोबारा करणारे मुद्देमालासह जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई 


। अहमदनगर । दि.29 मार्च । नगर शहरातील महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने ओढुन मोटार साकलवर पळुन जाणारे दोन सराईत गुन्हेगार 1,10,000/-रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.

आरोपीमध्ये सादक शमलखान इराणी व त्याचा साथीदार रियाज फय्याज इराणी (दोघे राहणार इराणी मोहल्ला, श्रीरामपूर) असे आहेत.

माहिती अशी की, हिराबाई रोहिदास हराळ या भिंगार येथे मोपेड गाडीवरुन किल्ला चौकातील डीपी जवळ चालले असताना त्यांचे पाठीमागुन काळ्या व लाल रंगाचे मोटारसायकल आलेल्या आरोपींनी हराळे यांना काय आजी म्हणुन त्याच्या गळ्यातील मंगळसुत्र बळजबरीने ओढुन तोडुन चोरुन नेले होते. यानंतर त्यांनी भिंगार कॅम्पला गुन्हा दाखल केला.

यानंतर तपासकामी अधिक्षक यांनी तपासाची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरिक्षक अनिल कटके यांच्याकडे दिली होती. यावरुन कटके यांनी गुन्हयाच्या तपासा दरम्यान माहिती मिळाली की, सादक शमलखान इराणी हा त्याचे साथीदारासह चोरलेले सोन्याचे दागिनी श्रीरामपूर येथील सोनाराकडे मोडण्यासाठी येणार आहे.

खात्रीलायक बातमी नुसार कटके यांनी खात्री करुन कारवाई करण्याबाबत पथकाला सुचना केल्या. पथकाने श्रीरामपूर येथे सापळा लावून सादक शमलखान इराणी व त्याचा साथीरास यास ताब्यात घेतले. यानंतर चौकशी केली असता व अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात 22 ग्रॅम वजनाचे दोन मंगळसुत्र मिळून आले. यावर अधिक चौकशी दरम्यान त्यांनी सदरचा काही मुद्देमाल भिंगार येथील चोरीचा असल्याची कबुली दिली. आरोपीकडून मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
 
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक श्रीरामपूरच्या स्वाती भोर, उपविभागीय पोलिस शहर विभागाचे अधिकारी अनिल कातकाडे, उपविभागयी पोलिस अधिकारी श्रीरामपूरचे संदीप मिटके, श्रीरामपूर विभागाचे सुचना व मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील पोसई सोपान गोरे, भाऊसाहेब काळे, विजय वेठेकर, दत्ता हिंगडे, बबन मखरे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, सचिन आडबल, विशाल दळवी, राहुल सोळेंके, आकाश काळे, रणजीत जाधव, मपोना भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे, चापोहेकॉ संभाजी कोतकर, उमाकांत गावडे, यांनी केली.

Post a Comment

Previous Post Next Post