। अहमदनगर । दि.31 मार्च । राहुरी तालुक्यातील नगर-मनमाड रस्त्यावर गुहा शिवारात रस्त्याने पायी चाललेली महिला वंदना विलास सौदागर (वय 39, रा. गुहा, ता. राहुरी) यांना भरधाव वेगातील तवेरा गाडीवरील (क्रमांक एमएच 04 सीजे 1143) चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत अविचाराने गाडी चालवून महिलेला धडक दिली.
ही धडक इतकी जोराची होती की, या भीषण अपघातात वंदना विलास सौदागर ही विवाहित महिला जागीच ठार झाली. अपघात होताच गाडीचालक अपघात स्थळावरून फरार झाला. ही घटना सायंकाळी. 5.30च्या सुमारास घडली.
या प्रकरणी विलास भिवसेन सौदागर (रा. गुहा) यांनी राहुरी पोलिसात फिर्याद दिल्यावरुन तवेरा गाडी चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस हवालदार गर्जे हे तपास करीत आहेत.
Tags:
Ahmednagar