। अहमदनगर । दि.29 मार्च । श्रीरामपूर एमआयडीसीत प्रिंटिंगसाठी वापरली जाणारी शाई बनविणार्या सरफेस कोटिंग या कंपनीला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत कंपनी पूर्णपणे जळून खाक झाली असून, कोट्यावधींचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. दरम्यान, सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.मात्र आगीचे कारण समजू शकले नाही.
श्रीरामपूर एमआयडीसमध्ये कृष्णा यादव यांची प्लॉट नं.सी.89 मध्ये सरफेस कोटिंग नावाची प्रिंटिंगसाठी लाणारी शाई बनविणारी कंपनी आहे. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास रोजच्याप्रमाणे काम सुरु असताना अचानकपणे आग लागली.
यावेळी यादव व कंपनीतील तीन ते चार कर्मचारी यांनी आग विरोधक नळकांडेही फोडले. मात्र आग आटोक्यात येत नसल्याने त्यानीं बाहेरच्या दिशेने पळ काढला. यानंतर आगीने रौद्ररुप धारण केले.
मोठमोठे स्फोट होत होते. आग विझवण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिकाच्या अग्निशमक, बंबांना तातडीने पाचारण करण्यात आले होते. तसेच साई सस्थिांचा फोमचा बंबही घटनास्थळी दाखल झाला. दुपारी तीन वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरु होते.
दरम्यान, घटनेची माहिती समजताच प्रांताधिकारी अनिल पवार, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, शहर पोलिस निरिक्षक संजय सानप, तहसीलदार प्रशांत पाटील, आमदार लहू कानडे, इंद्रनाथ थोरात, ज्ञानेश्वर मुरकुटे, एमआयडीसीतील उद्योजक बाबासाहेब काळे व कर्मचारी घटनस्थळी दाखल झाले. तर महाविरणच्या कर्मचार्यांनी तातडीने परिसरातील वीज बंद केली.
Tags:
Ahmednagar