महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारास चपलांचा हार...

। अहमदनगर । दि.30 मार्च । अहमदनगर येथील वीज वितरण कंपनी कार्यालयवीज वितरण कंपनी कार्यालयाला चपलांचा हार घालून निषेध व्यक्त करण्यात आला तसेच संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, जिल्हा सचिव नितीन भुतारे, डॉ. संतोष साळवे  ,संकेत व्यवहारे, तुषार हिरवे,गणेश शिंदे आदी मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नितीन भुतारे म्हणाले की, केंद्र व राज्य सरकारच्या वीज उद्योगाचे खाजगीकरण या, करण्याच्या धोरणा विरोधात महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता, संघर्ष समिती आणि महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या जवळपास २९ संघटनांनी संप चालू केला आहे.

या संपात सर्वच अधिकारी कर्मचारी सहभागी झाल्याने सोमवारपासून जाणूनबुजून हळू हळू शहराची बत्तीगूल कारण्यात आली आहे.

मंगळवार सकाळ पर्यंत शहरातील अर्ध्याच्यावर भागातील वीज गेल्याने नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला सध्या उन्हाळा सुरू असल्याने वीज गेल्याने अनेकांना रात्र जागून काढावी लागली तर काही भागात सोमवार सकाळपासूनच लाईट नसल्याने पाण्याची मोठी बोंबा बोंब झाली आहे.

वीज वितरण कंपनीचा कोणताच अधिकारी आणि कर्मचारी फोन उचलत नसल्याने  तसेच मुद्दामून कर्मचाऱ्यांनी वीज बंद केल्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हे आंगोलम करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post