नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष पदी रोहिदास कर्डिले

नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्ष रोहिदास कर्डिले

श्रीगोंदा - विधानसभा मतदार संघाच्या अध्यक्ष पदी शरद खंडेराव पवार यांची निवड जाहीर

। अहमदनगर । दि.02 मार्च । राष्ट्रवादी भवन, अहमदनगर येथे नगर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका अध्यक्ष रोहिदास कर्डिले यांची तर श्रीगोंदा - नगर विधानसभा अध्यक्ष पदी शरद खंडेराव पवार यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केल्याचे नियुक्ती पत्र देऊन केली आहे.

यावेळी प्रदेश उपाध्यक्ष घन:शाम शेलार, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, युवक कार्याध्यक्ष संजय कोळगे, किसनराव लोटके, अंबादास गारुडकर, सिताराम काकडे, प्रकाश पोटे, बाळासाहेब जगताप, आदीसह पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.


यावेळी फाळके म्हणाले कि, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार यांचे पुरोगामी विचार व पक्षाचे ध्येय धोरणे समाजात रुजवून पक्ष संघटना मजबूत करावी.पक्षाचे नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री मा.ना.जयंतराव पाटील, व मा.खा.सुप्रियाताई सुळे यांचे मार्गदर्शनानुसार सर्व सामान्य जनतेच्या विकासाचे प्रश्न सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील रहावे.

रोहिदास कर्डिले व शरद खंडेराव पवार हे राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात अनुभवी असल्याने याचा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढविण्यासाठी निश्चितच होईल, असा मला विश्वास जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी व्यक्त केला.

कर्डिले म्हणाले, आगामी काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये नामदार प्राजक्तदादा तनपुरे, आ.निलेश लंके, प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार व माजी आमदार राहुल जगताप यांचे नेतृत्वाखाली जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणून नगर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद मोठी करणार असून तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांना विचारात घेऊन काम करणार असल्याचे कर्डिले यांनी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post