। अहमदनगर । दि.30 मार्च । नगर-मनमाड रोडवरील एमआयडीसीतील कंपनीच्या कार्यालयातून 50 हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना शनिवारी (दि. 26) रात्री 8 ते सोमवारी (दि. 28) सकाळी 10 वाजल्याच्या दरम्यान घडली.
याबाबतची माहिती अशी की, प्रतिक उमेदराय मेहता (रा. भुईकोट किल्ल्याजवळ, नगर) यांची एमआयडीसीमध्ये कोल्ड स्टोरेज अॅण्ड ग्रो प्रोडक्टस् कंपनी असून या कंपनीच्या पाठीमागील बाजूच्या दरवाजाची कडी तोडून अज्ञात चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला.
कंपनीच्या आवारात असलेल्या कार्यालयातील टेबलच्या ड्रावरचे लॉक तोडून त्यामध्ये ठेवलेली 50 हजार रुपयांची रोकड चोरुन नेली. ही बाब उघडकीस आल्यानंतर मेहता यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस नाईक मिसाळ करीत आहे.
--------------
खालील बातम्या देखील वाचा...
पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन करू
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय औषधांच्या विक्रीविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश
Tags:
Ahmednagar