। अहमदनगर । दि.13 जुलै । युवकांनी स्वतःत असलेले गुण ओळखले पाहिजे. स्वतः मध्ये असणार्या कमतरता भरून काढून त्यातून सामर्थ्य निर्माण केले पाहिजे. व्यसनापासून दूर राहून व्यासंगी कसे होता येईल. हे पाहिले तर प्रत्येक युवकाला आयुष्यात यशस्वी होता येईल, असे प्रतिपादन सध्या आसाम राज्यातील कोकराझार येथे पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत असलेले आयपीएस इंजिनियर प्रतिक ठुबे यांनी केले.
जिल्हा मराठा नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने झूम मीटिंग द्वारे आयोजित युवक आणि करियर’ या विषयावर ते बोलत होते. ठुबे यांनी आपल्या व्याख्यानात अनेक विषयांना स्पर्श केला.
ते म्हणाले, स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणे वाटते तितके सोपे नाही. आपला मित्र तेच करतो म्हणून आपण ते करावे, असे न करता आपल्यातील गुणवत्ता पाहून आपण ज्या विषयात यशस्वी होऊ शकतो. तो विषय निवडला तरी आपण त्यात करिअर करू शकतो.
कारण स्पर्धा परीक्षा यासाठी संयम महत्त्वाचा असतो किती काळ लागू शकतो. हे सांगता येत नाही आपली परिस्थिती आपली मानसिकता हे लक्षात घेतले पाहिजे.

Tags:
Ahmednagar