विधानसभेत रवी राणांनी राजदंड पळवला!


। मुंबई । दि.06 जुलै । पावसाळी अधिवेशनात दुसर्‍या दिवशी सुद्धा भाजपच्या आमदारांनी तुफान राडा घातला आहे. विधानभवनाच्या बाहेर भाजपकडून आंदोलन सुरू असून भाजपचे आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर आंदोलन करत असताना बडनेराचे आमदार रवी राणा यांनी सभागृहात काळा बोर्ड घेऊन महाविकास आघाडीसरकारविरोधात घोषणाबाजी करत विधानसभा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्याकडे धाव घेतली. त्यानंतर  राजदंड घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला.

यावेळी भास्कर जाधव आणि रवी राणा यांच्यामध्ये बाचाबाची झाली. मार्शलला बोलावून भास्कर जाधव यांनी रवी राणा यांना बाहेर काढण्याचे आदेश दिले.राजदंड पळवण्यात आल्यानंतर सभागृहाचे कामकाज थांबवण्यात आले नाही. 

कामकाज सुरूच ठेवण्यात आले होते.तर दुसरीकडे, भाजपच्या आमदारांनी आज सभागृहात न जाता विधानभवनाच्या पायर्‍यांवर ठिय्या मांडला होता. धी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे सर्व आमदारांनी पायर्‍यांवरच सभा भरवली होती.

Post a Comment

Previous Post Next Post