शाळकरी मुलीला त्रास देणार्‍याला एका वर्षाची सक्तमजुरी

। अहमदनगर । दि.14 जुलै । शाळकरी मुलीचा पाठलाग करून तिचा विनयभंग करणार्‍या राहुरीतील तरुणाला न्यायालयाने एक वर्षाची सक्तमजुरी व एक हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

संदिप नानासाहेब निकम (वय 34, रा. गौतमनगर, रेल्वे स्टेशन, राहुरी) असे त्याचे नाव आहे. विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी मोरे यांनी हा निकाल दिला आहे.

या खटल्यात सरकारपक्षाकडून विशेष सरकारी वकील म्हणून मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी काम पाहिले.  11 एप्रिल 2019 रोजी सकाळी तेरा वर्षाची मुलगी घरासमोर शाळेच्या बसची वाट पाहत होते.

त्यावेळी संदिप निकम याने त्याचा मोबाइल क्रमांक पीडितेला देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पीडितेने मोबाइल क्रमांक घेण्यास नकार दिला. त्यावेळी धमकावून त्याने मुलीला त्याचा मोबाइल नंबर दिला.

त्यानंतर काही दिवसाने मुलीच्या घरी जावून निकम याने तिला मला फोन का नाही केला, असे म्हणून तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. तर मुलगी आपल्या स्कुटी गाडीवरून घरी जात असताना त्याने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले.

तर काही दिवसाने तो मुलीच्या घरासमोरून वारंवार चकरा मारीत होता. याबाबत मुलीच्या आईने त्याला विचारणा केल्यानंतर त्याने मुलीच्या आईला शिविगाळ व दमदादी केली. त्यानंतर पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून संदिप निकम याच्याविरुध्द विनयभंग करणे,

धमकावणे, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश शेळके यांनी करून न्यायालयात दोषारोषपपत्र दाखल केले होते. या खटल्याची सुनावणी विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी मोरे यांच्यासमोर झाली.

Post a Comment

Previous Post Next Post