केडगाव-नेप्ती रस्त्याचे मजबुतीकरण न केल्यास आंदोलनाचा इशारा

। अहमदनगर । दि.15 जुलै । केडगाव-नेप्ती रस्त्याचे मजबुतीकरण करण्याची मागणी प्रभाग 16च्या नगरसेविका सुनीता संजय कोतकर यांनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांच्याकडे केली आहे.

या मागणीचे निवेदन संग्राम कोतकर, युवराज कोतकर, बबलू कोतकर, मंगेश मोटे, गौरव कार्ले, दत्ता कोतकर, प्रवीण उगलमुगले आदींनी दिले.

त्यानंतर अभियंत्यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची जाणीव करून देत रस्ता मजबुतीकरणाची आग्रही मागणी करण्यात आली. अन्यथा शिवसेना स्टाईलने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. निवेदनात म्हटले की,

केडगाव-नेप्ती मार्गावर कांदा मार्केट आहे. त्यामुळे या मार्गावरून मोठमोठ्या अवजड वाहनांची वाहतूक होते. त्यामुळे जागोजागी मोठमोठे खड्डे पडले आहेत.

या मार्गावरून जाणार्‍या अवजड वाहनांना मज्जाव करावा, तसेच या वाहनांनी केडगाव बायपासचा वापर करण्याबाबत उपाययोजना कराव्यात.

या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक छोटेमोठे अपघात होतात. या अपघातात आजपर्यंत अनेकजण जखमी झाले असून, काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. या भागातील नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

यापूर्वीही या रस्ता दुरुस्तीबाबत विविध संघटनांनी निवेदने दिली. मात्र. परिस्थिती जैसे थेच आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post