मार्केटयार्ड जवळील दुकान फोडून साहित्याची चोरी

। अहमदनगर । दि.11 जुलै । दुकानाचे पत्रे उचकटून कुणीतरी अज्ञात चोरांनी आत प्रवेश केला व दुकानातील गल्ल्यातील तीन हजार चारशे रुपयाची रक्कम, पारस कंपनीच्या दहा बादल्या व सहा मग्गे असे साहित्य चोरून नेले. ही घटना स्टेशन रोडवरील मार्केट यार्डजवळ नेवासकर पेट्रोल पंपाशेजारी असलेल्या दुकानात घडली. 

या दुकानाचे पत्रे कोणीतरी अज्ञात चोराने उचकाटून आत प्रवेश केला व आतील सामानाची उचकापाचक केली. दुकानातील गल्ल्यातील तीन हजार चारशे रुपयाची रोकड तसेच दुकानातील दहा बादल्या व सहा मग्गे असे साहित्य चोरून नेले. 

याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी केदार बडवे (वय 36, राहणार हिरवे गल्ली, नालेगाव) यांच्या फिर्यादीवरून घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली असून, अधिक तपास सहाय्यक फौजदार महादेव शिंदे करीत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post