। अहमदनगर । दि.13 जुलै । जिल्ह्यामध्ये रविवारी आणि सोमवारी जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. या जोरदार पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. पावसाच्या आगमनाने बळीराजा शेतीच्या कामाला लागला आहे. जिल्हयात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे.
गेल्या तीन दिवसापासून जिल्हयात कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु आहे. रविवारी आणि सोमवारी मात्र, पावसाने जोरदार हजेरी लावली. नगर शहर आणि परिसरात देखील जवळपास दिड ते दोन तास पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
गेल्या आठ दिवसापासून कडक उन आणि त्यातच आता पावसाच्या सरी कोसळल्याने नागरीक देखील सुखावले आहे. तर चार महसूल मंडलात अतिवृष्टी झालेली आहे. जिल्हयात सरासरी 45 टक्के पावसाची नोंद करण्यात आली आहे.
जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत सरासरी 448.1 मिमि पाऊस अपेक्षित आहे. आतापर्यंत सरासरी 201 मिलीमिटर पावसाची नोंद आहे. एकुण पावसाच्या तुलनेत 44.9 टक्के पाऊस झालेला आहे. यंदाच्या वर्षीपेक्षा मागील वर्षी अधिक पावसाची नोंद आहे.

Tags:
Ahmednagar