। अहमदनगर । दि.08 जुलै । श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यांकनाथ येथील किराणा दुकानात श्रीगोंदा पोलिसांनी छापा टाकून लाखो रुपयांचा तंबाखू आणि सुगंधी सुपारीच्या सुमारे 10 गोण्या गुटखा असा लाखो रुपयांचा माल जप्त केला.
याबाबत सविस्तर असे की श्रीगोंदा तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील किराणा दुकानात गुटख्याचा मोठा साठा केला असल्याची गुप्त माहिती पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी पोलिस उपनिरीक्षक गट यांना पोलिस पथकासह त्या ठिकाणी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.
त्या सूचनेवरून पोलिस उपनिरीक्षक गट यांनी पोलिस कर्मचार्यांसह किराणा दुकानात छापा टाकला व त्या ठिकाणी असलेला तंबाखू आणि सुपारीचा सुमारे 10 गोण्या गुटखा जप्त करण्याची कारवाई केली. या प्रकरणी संबंधित किराणा दुकानदारावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.