कार-कंटेनरच्या अपघातात दोन शिक्षकांचा जागीच मृत्यू
। अहमदनगर । दि.04 जुलै । नगर-पुणे महामार्गावर चास गवाजवळील घाटात पुढे चाललेल्या कंटनेरला कारने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोघा शिक्षकांचा जागीच मृत्यू झाला असल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली.
चंद्रशेखर लक्ष्मण (वय 42, रा.हडको, औरंगाबाद), संजय भानुदास लेंडाळ (वय 45, रा.बोधेगाव ता.शेवगांव) असे मृत शिक्षकांचे नाव आहे. यातील ठाकूर हे मठपाटी, औरंगाबाद तर लेंडाळ हे लाडसावंगी केंद्र औरंगाबाद येथे जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते.
संजय लेंडाळ यांची मुलगी नवी मुंबई येथील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असून तिला सोडविण्यासाठी हे दोघे मित्र मुंबईला गेले होते. तेथून औरंगाबादला परतत असताना
नगर-पुणे महामार्गावर शुक्रवारी रात्री 10.30 च्या सुमारास चास घाटात पुढे चाललेल्या कंटेनरलवर त्यांची ईस्कोस्पार्ट कार (क्र.एमएच 20, डीजे 9695) जोरात धडकली.
हा अपघात इतका भीषण होता की, कारचा चक्काचूर होऊन दोघांचाही जागीच मृत्यू झाला. चास परिसरातील काही नागरीकांनी तसेच त्यांचा संपर्क असलेल्या शिखकांनी त्यांना दवाखान्यात दाखल करण्यासाठी प्रयत्न केले.
मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.त्यांच्या मृतदेहांच जिल्हा शासकयी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. याप्रकरणी नगर तालुका ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.