सोलापूमरमध्ये मराठा आरक्षण आक्रोश मोर्चा व ठिय्या

। सोलापूर । दि.04 जुलै । कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिली नव्हती. मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते.  सोलापुरातील  मराठा आरक्षण आक्रोश मोर्चा टेंभुर्णीजवळ अडवण्यात आला.  आंदोलकांना अकलूजच्या टेंभुर्णीजवळ अडवल्यानं आंदोलक आणि प्रशासनात तणाव वाढला.

धैर्यशील मोहिते आणि नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन केलं आहे. सोलापुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मराठा संघटनांच्या आंदोलकांनी आक्रोश मोर्चा काढला.

मोर्चासाठी शेकडो कार्यकर्ते सोलापुरात दाखल झाले आहेत. त्यानंतर पोलिसांकडून मोर्चा अडवण्यात आला. मोर्चावेळी 100 पेक्षा जास्त गाड्या सोलापूरकडे रवाना झाल्या. या गाड्यांमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील , धैर्यशील मोहिते पाटील यांचाही समावेश आहे.

मोर्चात तळपत्या उन्हात आणि प्रचंड उकाडा असूनही युवक आणि महिलांची संख्या मोठी आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विरोधात घोषणाबाजी सुरू आहे. आरक्षण मिळणे हा मराठा समाजाचा हक्क आहे. शासन कोणतीही मेहरबानी करत नाही अशा घोषणा यावेळी देण्यात येत आहेत.

सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणाहून दुपारी 12 वाजता मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स ओलांडून आंदोलक आंदोलनस्थळी दाखल झाल्याचं दिसलं. मोर्च्याच्या पार्श्‍वभूमीवर शहरात 2 हजार ग्रामीण भागात 2 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. शहरात येणारे सर्व मार्गांवर नाकेबंदी करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post