। अहमदनगर । दि.03 जुलै ।श्रीगोंदा पोलिसांना गेल्या सहा वर्षांपासून मोक्का गुन्ह्यात फरार असलेल्या दोन आरोपींना पकडण्यात यश आले आहे.
संतोष ऊर्फ वंट्या दिलीप काळे आणि राहुल भारत चव्हाण, या दरोडेखोरांना पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शेडगाव जवळा येथे कोंबिंग ऑपरेशन करत असताना अटक केली.
संतोष काळे आणि राहुल चव्हाण हे दोघेही अट्टल दरोडेखोर होते. त्यांनी अनेक चोर्या केल्या असून त्यांच्यावर मोक्का लावण्यात आला होता. मात्र गेल्या सहा वर्षांपासून ते फरार होते.
अखेर श्रीगोंदा पोलिसांनी त्यांना अटक केलीये.श्रीगोंदा पोलिसांनी गेल्या सहा वर्षांपासून मोका गुन्ह्यात फरार असलेल्या दोन आरोपींना बेड्या ठोकल्यात.
पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी शेडगाव जवळा येथे कोंबिंग ऑपरेशन करत असताना आरोपींना अटक केली.