सोने जैसे थे तर चांदी सत्तर हजार पार!

। मुंबई । दि.05 जुलै । गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरारत चढ उतार होत आहे. मध्यतरी चांदीच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. रविवारी संध्याकाळी मार्केट बंद होताना चांदीच्या दरात तब्बल 1200 रुपयांची वाढ होऊन ती आता सत्तर हजारांच्या पार गेली आहे.

रविवारी 69,200 रुपये भाव असणारी चांदी आज एक किलोसाठी 70,400 रुपयांवर पोहोचली आहे. सोन्याच्या भावात केवळ 10 रुपयांची वाढ झाली असून मुंबई आणि पुण्यात आज 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 47,320 रुपये इतका आहे तर 22 कॅरेट सोन्याचा भाव हा 46,320 रुपये इतका आहे.

गेल्या आठवड्याचा विचार करता चांदीमध्ये मोठी चढ-उतार पहायला मिळाली आहे. 30 जून रोजी चांदीमध्ये 400 रुपयांची घट झाली होती. त्यानंतर 1 जुलैला 1100 रुपये, 3 जुलैला 700 रुपये तर आज 1200 रुपयांनी चांदीच्या दरात वाढ झाली आहे. तुलनेने सोन्याच्या किंमतीत किरकोळ बदल होताना दिसत आहेत.  

Post a Comment

Previous Post Next Post