मराठा आंदोलकांची घोषणाबाजी ;
मराठा समाजाला आरक्षण आणि
स्वप्नील लोनकरला न्याय द्या मागणी
। मुंबई । दि.05 जुलै । अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संभाजी ब्रिगेडची विधानभवनावर धडकल्याने प्रशासानाची चांगलीच धांदल उडाली. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, स्वप्नील लोनकर यांना न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी यावेळी संभाजी ब्रिगेडने केली. तर जय जिजाऊ...जय शिवराय घोषणांनी परिसर दणानून गेला होता.
पावसाळी अधिवेशनाचा आजचा हा पहिला दिवस असल्याने अधिवेशनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र संभाजी ब्रिगेडचे आंदोलकांनी या ठिकाणी जाब विचारत आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. यामुळे काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता. यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले.
यावेळी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी मराठा समाजाचे ओबीसीकरण, ओबीसीचे संरक्षण, 2185 नियुक्त्या, सर्व समाज घटकाची जातिनिहाय जनगणना व एमपीएसी परिक्षा उत्तीर्ण स्वप्निल लोनकर आत्महत्या प्रश्नावर विधान भवनासमोर आंदोलन केले.
अजून किती स्वप्निलच्या आत्महत्येची वाट बघत आहे?
एमपीएससीला स्वायत्तता दिली आहे. परंतु स्वायत्तता म्हणजे स्वैराचार नाही दीड दोन वर्ष परीक्षा होत नाहीयेत मुलाखती होत नाहीत मुलाखती झाल्या तर नियुक्त्या नाहीत असे अनेक विद्यार्थी निराशेच्या गर्तेत सापडलेले आहेत.. एमपीएससी बोर्डावर लोक नाहीयेत सरकार पावले उचलायला तयार नाहीये सरकार विद्यार्थ्यांच्या व्यथा ऐकायला तयार नाहीये, असा हल्लाबोल संभाजी ब्रिगेडने केला.