चिंता वाढली : नव्या बाधितांच्या संख्येत वाढ... वाचा सविस्तर

 आज ४०१ रूग्णांना डिस्चार्ज तर  

नव्या ४७५ बाधितांची रुग्ण संख्येत भर

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.९९ टक्के


। अहमदनगर । दि.06 जुलै ।  जिल्ह्यात आज 401 रुग्णांना  रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 2 लाख 74 हजार 29 इतकी झाली आहे.

रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 96.99 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 475 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 2 हजार 559 इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये 21, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 194 आणि अँटीजेन चाचणीत 260 रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 06, कर्जत 01, नगर ग्रा. 04, पारनेर 02, राहुरी 01, संगमनेर 03, श्रीगोंदा 02 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 11, अकोले 01, जामखेड 04, कर्जत 11, कोपरगाव 08, नगर ग्रा.13,  नेवासा 11,  पारनेर 07, पाथर्डी 24, राहता 15, राहुरी 21, संगमनेर 18, शेवगाव 16, श्रीगोंदा 28, श्रीरामपूर 03 आणि इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 260 जण बाधित आढळुन आले. मनपा 07, अकोले 12,  जामखेड 19, कर्जत 19, कोपरगाव 11, नगर ग्रा. 09, नेवासा 13, पारनेर 39, पाथर्डी 17,  राहाता 15, राहुरी 17, संगमनेर 29, शेवगाव 05, श्रीगोंदा 36, श्रीरामपूर 09 आणि इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज  डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये मनपा 08, अकोले 21, जामखेड 16, कर्जत 25, कोपरगाव 12, नगर ग्रा. 17, नेवासा 19, पारनेर 62, पाथर्डी 29, राहता 19, राहुरी 29, संगमनेर 20,  शेवगाव 33, श्रीगोंदा 61, श्रीरामपूर 22, कँटोन्मेंट बोर्ड 01 आणि इतर जिल्हा 07 अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या : 2,74,029

*उपचार सुरू असलेले रूग्ण : 2559

*पोर्टलवरील मृत्यू नोंद : 5940

*एकूण रूग्ण संख्या : 2,82,528


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

06 जुलै, 2021


घराबाहेर पडताना चेहर्‍यावर मास्क अवश्य लावा

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा


स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

Post a Comment

Previous Post Next Post