आजपासून राज्यात मुसळधार पावसाची शक्यता

। पुणे । दि.08 जुलै । गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा कोसळायला सुरुवात केली आहे. आजपासून मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि विदर्भात काही ठिकाणी मोसमी पाऊस सक्रीय होणार आहे.

तर 10 जुलैपासून राज्यात सर्वत्रच मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

आज दि.8 जुलै  पुणे, नगर, नाशिक, जळगावात काही ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह पाऊस. तर परभणी, हिंगोली, नांदेडमध्येही पावसाची हजेरी लावण्यची शक्यता वर्तवली जात आहे.

महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल झाला. मात्र, जूनच्या अखेरच्या दिवसानंतर राज्यातील विविध ठिकाणी पावसानं दडी मारली आहे. विदर्भात यंदा मान्सून वेळेआधी दाखल झाला होता.

सुरुवातीच्या पावसाच्या जोरावर विदर्भातील शेतकर्‍यांनी पेरणी केली होती. मात्र, पावसाचा मोठा खंड पडल्यानं शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. त्यामुळे जर पाऊस पुन्हा सक्रीय झाला तर शेतकर्‍यांना काही प्रमाणाता दिलासा मिळेल.

Post a Comment

Previous Post Next Post