। अहमदनगर । दि.17 जुलै । अमरावतीहून मुलीला पुणे येथे कॉलेजला सोडण्यासाठी कारने जाणार्या डॉक्टरांच्या कुटुंबास चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील 65 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला.
ही घटना नेवासा येथील नगर-औरंगाबाद रोडवरील प्रवरा संगमपुढे हिंदुस्तान हॉटेल जवळ सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. डॉ. विनायक (वय 57, राहणार कृषी सागर कॉलनी, साईनगर, अमरावती) हे भाडे तत्वाने घेतलेल्या कारने मुलगी पियुषा हिला पुणे येथे कॉलेजला सोडवण्यासाठी जात असताना औरंगाबाद रोडवरील प्रवरा संगमपुढे गाडी पंचर झाली.
कारचालक टायर बदलत असताना तेथे अमोल शेलार व ज्ञानेश्वर शेलार (राहणार मुकिंदपूर, नेवासा) हे आले व त्यांनी चाकूचा धाक दाखवून शिवीगाळ, दमदाटी करीत दहा हजार रुपयाची रोकड, सोन्याच्या बांगड्या, सॅमसंग कंपनीचा मोबाईल,
आधारकार्ड, डेबिटकार्ड, पत्नी व चालक सूर्यप्रकाश यांचे मोबाईल तसेच तेथे बाजूला उभ्या असलेल्या ट्रकचा चालक याचा मोबाईल असा 65 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलिसांनी जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक भाटेवाल करीत आहेत.