। अहमदनगर । दि.13 जुलै । किराणा दुकानाच्या मागे असलेल्या दरवाजाचे कडी-कोयंडा व कुलूप तोडून अज्ञात चोराने आत प्रवेश केला व आतील किराणा माल साहित्य व रोख रक्कम असा 92 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.
ही घटना केडगाव येथील सोनेवाडी रोडवरील कापरे मळा येथील ओम किराणा दुकान येथे घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की लक्ष्मण कापरे (राहणार कापरे मळा, सोनेवाडी रोड, केडगाव, अहमदनगर) यांच्या घराजवळ ओम किराणा दुकान आहे.
कापरे यांनी नेहमीप्रमाणे सायंकाळी दुकान बंद करून घरी गेले असताना कोणीतरी अज्ञात चोरांनी दुकानाच्या मागील दरवाज्याची कडी-कोंयडा-कुलूप तोडून आत प्रवेश केला व आतील सामानाचे उचकापाचक केली
आणि तेलाचा डबा, बदाम, काजू, शेंगदाणे असा 42 हजार रुपये किमतीचा किराणा माल व दुकानाच्या गल्यातील पन्नास हजार रुपये रोख असा 92 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेले. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद केली. अधिक तपास कोतवाली पोलिस करीत आहेत.