याबाबतची माहिती अशी की, संबंधित युवकाने कुत्रे चावल्याने रेबीजचा पहिला डोस घेतला होता व दुसरा डोस घेण्यासाठी तो श्रीरामपूर नगरपालिकेच्या दवाखान्यात गेला होता. रेबीजचे इंजेक्शन घेत असताना तेथे असलेल्या कोरोना चाचणी केंद्रात या तरुणाने सहज कोरोना चाचणीबाबत विचारपूस केली.
त्यावेळी तेथे असलेल्या महिला कर्मचार्याने त्याचे नाव व इतर माहिती तात्काळ रजिस्टरमध्ये नोंद करून घेतली. त्यानंतर सोमवारी (दि.5) नगरपालिकेतून या तरुणाला कोरोना पॉझिटिव्ह असल्याबाबतचा आरटीपीसीआर रिपोर्ट मोबाईलवर प्राप्त झाला. स्वॅब न घेता नगरपालिका रुग्णालयाने कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट दिल्याने या तरुणाला मोठा धक्का बसला आहे.
तसेच कोरोना पॅाझिटिव्ह रिपोर्टमुळे कारेगाव ग्रामपंचायतीकडून व प्राथमिक आरोग्य केंद्राकडून सारखी विचारणा होत असल्याने या तरुणाला प्रचंड मनःस्ताप होत आहे. या प्रकारामुळे उलटसुलट चर्चा श्रीरामपूरमध्ये होत आहे.